आमदार सुभाष धोटेंच्या मास्टर स्ट्रोक ने गोंडपिपरीत भाजपला खिंडार.                                               

लोकदर्शन 👉मोहन भारती

 

⭕भाजपचे धुरंधर निलेश संगमवार, राकेश पून, सुनील फुकट यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश.

राजुरा :–
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या विचारसरणीचा स्विकार करीत आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन गोंडपिपरी येथील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे हितचिंतक निलेश संगमवार, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गोंडपिपरी नगर पंचायतीचे माजी बांधकाम सभापती राकेश पून, गोंडपिपरी भाजपचे शहर महामंत्री सुनील फुकट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी निलेश संगमवार यांची गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड केली असून येणाऱ्या काळात या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य मानसन्मान राखून आनखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येईल असे आश्वासन दिले. तर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांनी गोंडपिपरी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांना काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश देऊन गोंडपिपरीत काँग्रेस आणि आमदार सुभाष धोटे यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, पोळसा ग्रा प चे सरपंच तथा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव शंतनू धोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे, नागेश रत्ने, धनराज चिंचोलकर, प्रा. प्रफुल्ल शेंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *