केंद्रातील पाखंडी भाजप सरकारमुळे सामान्य जनतेचे हाल. — आमदार सुभाष धोटे.


लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕पांढरपाैणी येथे काँग्रेसचे दोन दिवसीय जनजागरण अभियान.

राजुरा :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागरण अभियान राबविण्यात येत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यातील पांढरपौणी येथे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी प्रणेते क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून दोन दिवसीय जनजागरण अभियानाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी गावात जनजागरण फलक, घोषणा फलक लावून सायंकाळी गावकऱ्यांसमवेत सभा घेण्यात आली, गावकर्‍यांच्या जेवणाचा कार्यक्रम आटोपून भजनाच्या माध्यमातून जनजागरण करण्यात आले तर आज सकाळी गावातील भजनी मंडळी, शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला यांच्या समवेत गावात प्रभात फेरी काढून जनजागरण करण्यात आले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, आपल्या निवडक व्यापारी मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या जीवाशी खेळत आहे. तिन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जवळपास एक वर्षापासून ठान मांडून बसले आहेत. यात अनेक शेतकरी शहीद झाले आहेत. उत्तर प्रदेशात मंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारले परंतु मग्रूर सरकार या शेतकऱ्यांची साधी दखलही घेत नाही आहे. केंद्र सरकार एका मागून एक सरकारी संस्थांचे खासगीकरण करीत असून कामगार कायद्यांतील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत, या सरकारला सर्व सामान्य माणसाच्या जीवनमरणाचे काहीही देणेघेणे नाही म्हणूनच कोरोना सारख्या महामारी च्या तडाख्यात आर्थिक खाईत सापडलेल्या नागरिकांना इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचे गॅस, खाद्यतेल यांच्या दरात प्रचंड वाढ करून गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले जात आहे. केंद्रीतील पाखंडी भाजप सरकारमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. म्हणूनच जनतेने या अन्यायकारी, तानाशाही सरकारला धडा शिकवावा.
ते पुढे म्हणाले की पांढरपौणी येथे आपण आजपर्यंत सिमेंट रस्त्याची कामे पूर्ण केली आहेत तर येथे वाचनालयाच्या मंजूर कामाचे ई टेंडरींग झालेले असून लवकर सुरूवात होणार आहे. तर गावकऱ्यांच्या मागणीनुसार येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्मारक आणि पांदन रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी सभापती बाबुराव पाटील लांडे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सभापती मुमताज जावेद अब्दुल, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, आदिवासी नेते नामदेव कुमरे, पाचगावचे शंकर गोणेलवार, आत्माचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, विहिरगाव चे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर, देवाडाचे उपसरपंच जावेद अब्दुल, चनाखाचे उपसरपंच विकास देवाळकर, पेल्लोरा चे विनोद झाडे, अभिजीत धोटे, शंतनु धोटे, धनराज चिंचोलकर यासह पांढरपौणी येथील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ईरशाद शेख यांनी मानले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *