आ. धोटे यांच्या प्रयत्नाने अखेर तेंदूपत्ता मजूरांना दिवाळी पर्वावर बोनसचे वितरण.

By : Mohan Bharti

राजुरा  :– मध्य चांदा वन विभाग राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत तेंदूपत्ता मजूरांना महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त तेंदूपत्ता बोनस चे वितरण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना आणि अन्य काही तांत्रिक कारणांमुळे तेंदूपत्ता मजूरांचे बोनस वाटप रखडले होते. आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला मात्र थोडा उशीर झाला. तेंदूपत्ता मजूर आणि काही संघटनांनी हा प्रश्न आमदार सुभाष धोटे आणि शासनाकडे परत लावून धरला होता. आमदार धोटे यांनी मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे पून्हा पून्हा ही मागणी लावून धरली आणि अखेर महाराष्ट्र शासनाने या लाभार्थींसाठी निधी मंजूर केला. दिवाळीच्या पर्वावर या बोनस वाटपाचे शुभारंभ करण्यात आले. यात राजुरा, विहिरगाव आणि खांबाळा या वनपरिक्षेत्रातील सन २०१९ ची तेंदूपत्ता बोनस लाभार्थ्यांची एकूण संख्या २, १६६ एवढी असून २९, ८१, ६८२ रूपये बोनस वाटपाचे नियोजन आहे. आज संतोषी मोहुर्ले – ९७० रूपये, बयनाबाई सुरकर – १०७६ , ज्योती रागीट – १५७१, सुरेश धोंगे – १३४६, सिंधु वडस्कर- १२३३, सुनंदा येलमुले-१८३२, सुरेश कुईटे- १६९१, प्रभाकर शेरकी- ३०९०, भालचंद्र वाघमारे – २६१३ रूपये या प्रमाणे एकूण ९ मजुरांना तेंदूपत्ता बोनस धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी विभागीय वनाधिकारी अरविंद मुंढे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्र सहाय्यक विहिगाव देशकर, वनविभागाचे कर्मचारी, तेंदूपत्ता मजूर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *