पारडी येथे लघु विज्ञान केंद्राचे उद्घघाटन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर –
सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय शिक्षण संस्था मांडवा द्वारा संचालित प्रियदर्शनी हायस्कूल पारडी येथे आर सी सी पी एल द्वारा लघु विज्ञान केंद्राचे उद्घघाटन २६ ऑक्टोबर ला पार पडले.
या कार्यक्रमाचे उदघाटन कोरपना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद धूर्वे यांनी , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सुधाताई उत्तमराव मोहितकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे, केंद्रप्रमुख संजय त्रिपतिवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सीमा मालेकर , संचालन लांडे यांनी केले तर आभार मरापे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here