आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात नेत्र तपासणी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना*……..

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर:- आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन गडचांदूर शहर काँग्रेस कमेटि तर्फे घेण्यात आले होते. शिबिरातील पहिली ३२ रूग्णांची बस २६ ऑक्टोबर रोज मंगळवरला शस्त्रक्रियेकरिता मेघे सावंगीला गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली रवाना करण्यात आली.
याप्रसंगी जेष्ठ नेते माजी पं.स. सभापती नोगराज मंगरुळकर यांचा आज वाढदिवस या शुभप्रसंगी त्यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखवत नेत्र शस्त्रक्रिया व प्रवास सुखकर व्हावा याकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थिती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, आरोग्य सभापती राहुल उमरे, आरोग्य विभागाचे डाॅ.बुऱ्हाण, मेघे सावंगी चे प्रतिनिधी झोडे साहेब हे होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष महाडोळे अध्यक्ष गडचांदूर शहर काँग्रेस कमिटी, रूपेश चुधरी युवक काँग्रेस अध्यक्ष, आशिष वांढरे, राहूल थेरे, प्रणय टेकाम, तुकाराम चिकटे , बाबा खामणकर यानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here