नांदाफाटा येथे निराधार विधवा गरजु महीलांना ब्लँकेट वाटप

By : Mohan Bharti

युवक मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम

औद्योगिक वसाहत नांदा नगरीत ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गणेश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदा शहर युवक मित्रमंडळाचे वतीने स्थानिक विधवा निराधार गरजू महिलांना ब्लँकेट व दिवाळी साजरी करण्याकरिता गोड भेट देऊन सन्मान व सत्कार करुन वाढदिवस साजरा करण्यात आला या स्तुत्य उपक्रमाचे गावकर्‍यांनी कौतुक केले आहेत

नांदा येथील युवक नेहमीच गोरगरीब विधवा गरजू व निराधार महिलांच्या मदतीसाठी नेहमीच कार्यरत असतात त्यांनी कोरोना काळात अन्नधान्याच्या किट सोबत कुणीही उपश्यापोटी झोपू नये या करिता जेवनाचे पार्सल वाटप करण्यात त्यांचा सहभाग होता याच संकल्पेतून गणेश लोंढे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदा शहर युवक मित्रमंडळातर्फे सांस्कृतिक भवन नांदा येथे दिनांक २३ ऑक्टोबरला वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून स्थानिक विधवा निराधार गरजू महिलांचा ब्लँकेट व भेटवस्तू देऊन ५५ महीलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी गावकरी व लाभार्थी महिलांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती गणेश लोंढे यांच्या कार्याबाबत मान्यवरांनी स्तुतिसुमने उधळली कार्यक्रमाचे संचालन प्रा.आशिष देरकर यांनी केले आभार अभय मुनोत यांनी मानले कार्यक्रमाला संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय मुसळे , माजी उपसरपंच बंडू वरारकर , मारोती बुडे , मुरली बोडखे , अरविन्द इंगोले , बंडू गायकवाड , हेमंत काळे , अंसार शेख , मोसीन खान , दिपक खेकारे , सतिष जमदाडे , सचिन बोढाले , प्रमोद वाघाडे,हारुण सिद्दीकी,प्रशांत पानघाटे,नंदकिशोर खीरटकर,मनीष लोंढे,प्रवीण शंभरकर,यांची उपस्थिती होती नांदा शहर युवक मित्रमंडळाच्या वतीने स्तुत्य उपक्रम घेऊन विधवा निराधार गरजू महिलांचा सन्मान व सत्कार करुन वाढदिवस साजरा केल्याने महिलांमध्ये हर्ष व उत्साह होता या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *