ग्रामपंचायतीचे महानेट सुरु करण्याची नंदकिशोर वाढई यांची मागणी.

लोकदर्शन 👉 मोहन भारत

राजुरा :– महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये महानेट अंतर्गत इंटरनेट करिता लागणारे सर्व साहित्य ग्रा.पं. मध्ये लावण्यात आलेले आहेत परंतु अजून पर्यंत महानेटची इंटरनेटची सेवा सुरु झालेली नाही त्यामुळे ग्रामपंचायतींना आनलाईनची कामे करण्यास अडथळा निर्माण होत आहे. शिवाय ही यंत्रणा वापरात नसुनही ग्रामपंचायत च्या विज बिलावर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे महानेटची सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी कळमनाचे सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायत हा सरकारला नागरिकांशी जोडणारा महत्त्वाचा सेतू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये अध्ययावत इन्टरनेट सुविधा उपलब्ध असने गरजेचे आहे. यासाठीच सरकारने महानेट ची सुविधा निर्माण केली आहे. सर्व तांत्रिक अडचणींवर मात करून ही सुविधा लवकरात लवकर सुरू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here