टाकळी-जेना-बेलोरा कोळसा खाणीच्या जुन्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला व रोजगार द्यावा – हंसराज अहीर

By : Shivaji Selokar

चंद्रपूर – गेल्या 19 वर्षांपासून मेसर्स सेंट्रल काॅलरीज कोळसा खाण प्रकल्प बंद पडल्याने या प्रकल्पाकरीता अधिग्रहीत झालेल्या सर्व जमिनींचे अधीग्रहण रद्द करावे व या जमिनी नव्या सुधारीत दरानुसार घ्याव्या. यापूर्वी जमिनीपोटी प्राप्त झालेला मोबदला कपात करावा, नौकरीची हमी द्यावी व पूर्व 15 कामगारांना 19 वर्ष काम न मिळाल्याने त्या कालावधितील संपूर्ण वेतन देवू करावे अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे अवगत करुन जारी केलेल्या निवेदनात हंसराज अहीर यांनी म्हटले आहे की, भद्रावती तालुक्यातील मौजा बेलोरा, किलोनी, सोमनाळा रिठ, टाकळी, जेना आदी गावातील सुमारे 218.56 हे.आर. जमिनीचे अधीग्रहण भूसंपादन अधिनियम 1894 कलम 4(1) अन्वये दि. 05 जानेवारी 1999 मध्ये जारी अधीसुचनेनुसार करण्यात आले होते. सेंट्रल काॅलरीज कोळसा खाण प्रकल्पाने जमिनीचा मोबदला व प्रकल्पग्रस्तांना नौकऱ्या देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार 15 प्रकल्पग्रस्तांना नौकरीत सामावून घेतले.
परंतु लगेचच 2002 पासून म्हणजेच गत 19 वर्षांपासून ही कोळसा खाण बंद पडल्याने संबंधित शेतकऱ्यांची उपजावू जमिन विनाकरण अडकून पडली, नौकरीही गेली, रोजगारसुध्दा बुडाला त्यामुळे संपूर्ण पिढी बरबाद झाली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी यामुळे हवालदिल आहेत.अरविंदो रियालिटी कंपनीस सज्जड इशारा
सदर कोळसा खाण प्रकल्प आता अरविंदो रियालिटी कंपनी चालविण्यास घेत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने 19 वर्षापूर्वी अल्प मोबदल्यात अधिग्रहीत झालेल्या या जमिनींचे अधीग्रहण रद्द करुन या सर्व जमिनी नव्या सुधारीत दराने अधीग्रहीत करण्यात याव्यात अशी मागणी अहीर यांनी केली आहे.पूर्वाश्रमिच्या खाण प्रकल्पाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला जमिनीचा मोबदला कपात करुन नव्याने सुधारीत दरानुसार अधीग्रहण करावे. तसेच पूर्वीचे अधीग्रहीत प्रकल्पग्रस्त व भूमी अधीग्रहण झालेल्या जमिनीचा मोबदला व नौकरीविषयक प्रश्न मार्गी लावूनच हा नव्याने होणारा कोळसा खाण प्रकल्प सुरु करण्याची भूमीका घ्यावी. अन्यथा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी जनआंदोलनद्वारे प्रखर लढ्याचा मार्ग अवलंबिला जाईल असा इशारा पूर्व केंद्रीय राज्यमंत्रयांनी प्रस्तुत निवेदनाद्वारे दिलेला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर दरम्यान या प्रश्नी संबंधित प्रकल्पपिडीत शेतकऱ्यांच्या वतीने भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांचे नेतृत्वात बंडू गाडगे, गणपती अवताडे, श्रीकृष्ण झाडे, रेवनाथ रामटेके, गोकुलदास बुच्चे, विलास बुच्चे, विस्मय बहादे आदी प्रकल्पग्रस्तांनी हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांचेपुढे आपली व्यथा मांडत न्याय मिळवून देण्याची विनंती केली व विविध मागण्यांचे त्यांना निवेदन सादर केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *