शेतकरी कल्याण निधी अंतर्गत हर्षल कोडापे यांना २५ हजाराची मदत.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण.

गोंडपिपरी :– गोंडपिपरी तालुक्यातील मौजा करंजी येथील हर्षल रामप्रसाद कोडापे यांना शेतकरी कल्याण निधी अंतर्गत अपघातावरील वैद्यकीय उपचारा करीता आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. चंद्रपूर तर्फे रूपये 25 हजार रुपयाची अर्थिक मदत मंजूर करण्यात आली. राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांचा हस्ते रुग्णाच्या आईला धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बंडूभाऊ तेल्कापल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते तुकेशभाऊ वानोडे, सुरेश श्रीवास्कर, आशिष निमगडे, ग्रा.प.सदस्य सचिन तेल्कापल्लीवार, मिलींद बक्षी, अनंता तेल्कापल्लीवार, सचिन वाढई, मधूकर तेल्कापल्लीवार यासह गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here