अस्मानी संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या ,,,ओम पवार

– लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर
– अतिपावसामुळे कोरपना तालुक्यातील सोयाबीन कापूस आदी शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. या मागणीसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कोरपना यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांचे नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव दिनेश सुर , युवा नेते दिनेश खडसे अभय डोहे व भाजप पदाधिकारी आदी उपस्थित होते. कोरपना हा शेतीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. येथील मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. त्यामुळे उपजीविकेचे साधन हेच आहे. आधीच कोरोना वैश्विक संकटाने सारे जग ग्रासले असताना. आता कुठे महामारी संकटातून घडी सावरत असताना. अतिपावसामुळे सोयाबीन, कापूस पिकाचे नुकसान झाल्याने शेतपिकाना मोठा फटका बसला आहे. त्यांना आर्थिक दृष्ट्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *