कॅन्सरला हरवण्यासाठी शेतकरी कल्याण निधिने मिळणार ‘ तिला ‘ जगण्याचे बळ !

By : Mohan Bharti

गडचांदूर:- कॅन्सर झाल्यावर भल्या भल्याची गाळण उडते, जगण्याची आशा संपते. पण या संभ्रमीत अवस्थेमध्ये रुग्णासह त्याच्या कुटुंबाला ही मानसिक पाठिंबा , आर्थिक पाठबळ देण्याचे भरीव काम चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शेतकरी कल्याण निधीतून होत आहे. कोरपना तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील शेतकरी पत्नी सुनंदा रामेश्वर वेलादी यांना तीन महिन्यांपूर्वी स्तनाच्या कॅन्सर या आजाराने ग्रासले. डॉक्टरानी यावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया सांगितली. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना आर्थिक मदत कुठून मिळणार असा प्रश्न भेडसावयला लागला. ही बाब माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे यांच्या कानी पडली. त्यांनी ही समस्या जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांना सांगितली. लागलीच याची त्यांनी दखल घेत जिल्हा बँकेच्या वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून शेतकरी कल्याण निधी अंतर्गत तीस हजार रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली. शुक्रवार दि. १ ऑक्टोबरला मदतीचा धनादेश जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या हस्ते कॅन्सर ग्रस्त शेतकरी पत्नी सुनंदा रामेश्वर वेलादीं यांना सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे, सामाजिक कार्यकर्ते रसूल पटेल, रामेश्वर कर्णुजी वेलादी , कोरपना शाखेचे व्यवस्थापक एस जी बुचुंडे व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. या मदतीमुळे त्यांना उपचारासाठी आर्थिक आधार प्राप्त झाला आहे. जिल्हा बँकेच्या शेतकरी कल्याण निधी या योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक गरजू शेतकऱ्यांना याचा संकट काळात आर्थिक लाभ होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here