राष्ट्रीय महामार्ग वर खड्ड्याचे साम्राज्य,,

लोकदर्शन👉 मोहन भारती

* गडचांदुर,कोरपना,नांदा फाटा रोड ची दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी.                                                 गडचांदुर*
चंद्रपूर जिल्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील महामार्गा ची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या तालुक्या तील रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता समजणे कठीण झाले आहे ,गडचांदुर – कोरपना हा राष्ट्रीय महामार्ग असून येथून मोटार सायकल चालवणे कठीण आहे.कोरपणा तालुक्यात सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे त्यात आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त सिमेंट कंपन्या आहे त्यात अल्ट्रटेक सिमेंट,माणिकगड सिमेंट,अंबुजा सिमेंट व दालमिया सिमेंट या उद्योगाचा समावेश आहे. ट्रक रहदारी जास्त आहे. दिवस रात्र सुरू असते ,व कामगार संख्या सुद्धा भरपूर आहे .त्या करीता येथे रस्ते चांगले असणे आवश्यक आहे ,त्या करीता घुग्गुस येथील सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी यांनी रस्ते दुरुस्ती बाबत चंद्रपूर येथील सार्वजनिक बाधकाम विभागा च्या अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले आहे ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here