गडचांदूर येथील निकृष्ट दर्जाच्या नाली बांधकामाची चौकशी करून कार्यवाही करावी

* लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर

 

वार्डातील नागरिकांकची मागणी
गडचांदूर,,
नगरपरिषद गडचांदूर अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या बाबाराव पुरके ते राजू कादरी यांचे घरापर्यंत बांधण्यात येत असलेल्या नाली बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी वार्डातील नागरिक विक्की मून व इतर नागरिकांनी मुख्यधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन केली आहे.मागील तीन महिन्यापासून नालीचे बांधकाम चालू असून ते अत्यन्त निष्कृष्ठ दर्जाचे होत आहे.त्यात रेती सिमेंटचा वापर कमी करीत आहे,नाली ला बॉक्स न लावता एक साईड सेन्ट्रीग लावून नालीची भिंत टाकली आहे. अंदाजपत्रका नुसार खालील भिंतीची जाडीचे काँक्रेट टाकण्यात आले नाही.पोच रस्त्यावर रापट टाकले त्यात स्टील ,सिमेंट चा वापर कमी केला आहे.रापट च्या बाजूने भिंतीची जाडी कमी टाकली आहे.त्यामुळे तेथील काम दर्जेदार झाले नाही.आताच काही ठिकाणी काँक्रेट क्रॅक झाले आहे व काही दिवसातच ते काम कोसळू शकते व नगर परिषदची आर्थिक हानी होऊ शकते तेव्हा नगर परिषदचे हित लक्ष्यात घेता आपण योग्य चौकशी करून ते काम दर्जेदार करून घेण्यात यावे व अश्या दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here