हजारो नागरिकांच्या सहभागाने २ ऑक्टोबरला पीपीई किट घालून मंत्रालयावर रुग्ण हक्क परिषदेचा मोर्चा होणार – उमेश चव्हाण

मुंबई – रुग्णांची बेसुमार होणारी लूट, पैसे नाहीत म्हणून वेळेत न मिळणारे उपचार, हॉस्पिटल कडून पैशाअभावी रोखले जाणारे मृतदेह या घडणाऱ्या घटनांमुळे रुग्णांचे हक्क अधिकारावर गदा आणणार्‍या गंभीर घटना दररोज महाराष्ट्रात घडत असताना इथल्या गरिबांनी पैसे नाहीत म्हणून मरायचं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि म्हणून फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसह विद्यार्थ्यांचे प्रश्न, दररोज स्त्रियांवर होणारे बलात्कार, शेतीमालाला हमीभाव, डॉक्टरांचे संरक्षणाचे प्रश्न, वैद्यकीय साहित्य यंत्रसामग्रीवर सबसिडी दिली पाहिजे, धर्मदाय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांना चाप लावला पाहिजे अशा पद्धतीच्या तेरा प्रमुख मागण्यांसाठी गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी सेंट झेवियर्स कॉलेज पासून रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मुंबईत मंत्रालयावर पीपीई घालून हजारोंच्या संख्येने रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील शेजवळ, केंद्रीय कार्यालय सचिव गिरीष घाग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, बेरोजगारी वाढलेली आहे. युवकांना उद्योगधंद्यासाठी कोणत्याही बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. दररोज लहान मुलींपासून महिलांवर अन्याय अत्याचाराच्या सामूहिक बलात्काराच्या मन हेलावून टाकणाऱ्या बातम्या कानावर येत आहेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला असला तरी फी मध्ये कोणत्याही प्रकारची कपात करायला शिक्षण संस्थाचालक तयार नाहीत. सोयाबीनला भाव नाही. प्रक्रिया उद्योगाला आणि सर्वसामान्य नागरिकांना एकच भावाने शेतीमाल विकला जात आहे, हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, माणसाच्या आयुष्यातील सुख हिरावून घेऊन दुःख निर्माण करणारे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ सोडविले पाहिजेत, म्हणून गांधी जयंतीदिनी हजारो नागरिकांच्या संख्येने पीपीई किट घालून मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या आक्रोश महामोर्चामध्ये राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *