मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेत युवती सक्षमीकरण कार्यशाळा

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर, ता. २२ : बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा महानगरपालिका चंद्रपूर, येथे दोन दिवसीय युवती सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गौतम कोठारी, शहराध्यक्ष दीपेंद्र पारख यांनी पुढाकार घेऊन ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेचे उद्घाटन मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपिन पालिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये आठवी/ नववी/ दहावीच्या मुलींचा खूप चांगला सहभाग मिळाला. त्यामध्ये जवळपास शंभर मुलींनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेमध्ये वेगवेगळे विषय घेऊन मुलींपर्यंत आत्म जाणीव, संवाद आणि नातेसंबंध, मित्र आणि मित्रत्वाचा प्रभाव, निर्णय क्षमता वाढवणे, आत्मविश्वास जोपासणे, स्वसंरक्षण कसे करायचे अशा, विविध विषयांना घेऊन मुलीं पर्यंत चांगला संदेश पोहोचविण्यात आला. जेणेकरून आई-बाबां प्रती तसेच आपल्या परिवाराप्रती त्यांची भावना अतिशय चांगली व्हावी, शिवाय आपल्या शिक्षक वृद्धांचा तसेच मित्र-मैत्रिणींचा आपल्याला कसा चांगला फायदा होईल, ह्या गोष्टी पण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर मुलींनी संवाद चांगला करून नातं कसं चांगलं ठेवायचं, त्याच्यासोबतच आपण इतरांच्या भावनांचा आदर कसा चांगला करू शकतो, असा पण संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशिक्षक म्हणून हिंगोलीचे रत्नाकर महाजन, नागपूरचे नितीन पोहरे व दुर्ग (छत्तीसगड)चे अभिषेक ओसवाल यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here