काँग्रेस सर्व जाती-धर्मांना एकत्रित घेऊन चालणारा पक्ष -.- उत्तम पेचे

। लोकदर्शन👉 मोहन भारती

सोनुर्ली (वनसडी) येथे काँग्रेसचे ‘गाव चलो अभियान’

कोरपना – स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. काँग्रेसमुळेच देशाची एकत्रित मूठ बांधल्या गेली आहे. काँग्रेस सर्व जाती-धर्मांना एकत्रित घेऊन चालणारा पक्ष असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे यांनी म्हटले. आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गाव चलो अभियान प्रसंगी सोनुर्ली (वनसडी) येथे ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी गाव चलो अभियानचे समन्वयक आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव रोशन आस्वले, घनश्याम तुराणकर, माजी उपसरपंच सुधाकर नांदेकर, आनंदराव मोहूर्ले, तालुका महासचिव संदिप मोहूर्ले, सुनिल कांबळे, निलेश गुरूनूले, मधुकर नांदेकर, सुरेश सोनटक्के, सुहास पाटील,नंदकिशोर देवाळकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here