अंधश्रद्धेला बळी पडू नका : ठाणेदार आमले यांचे मार्गदर्शन

By : Shankar Tadas

गडचांदूर : अंधश्रद्धेला कोणीही बळी पडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी गावकऱ्यांना केले. आसन बु. येथे भेट देऊन त्यांनी संवाद साधला.

गावकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, परंपरा रितीरिवाज आणि अंधश्रद्धा याबाबत योग्य काय ते जाणून घेतले पाहिजे. त्याबाबत कायद्याची माहिती असावी. गावकऱ्यांनी अंधश्रद्धांना बळी पडून गुन्हा घडु नये म्हणून त्यांनी आवाहन केले.
गावकऱ्यांनीही अंधश्रद्धेच्या माध्यमातून कोणताही गुन्हा घडणार नाही असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी दिला.
बैठकीला गावचे सरपंच मंगलजी गेडाम, मडावी मेजर, बीट जमादार व पोलीस पाटील प्रवीण आडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here