सिमेंट उद्योग करिता शेत जमीन घ्यायची असेल तर सरळ शेतकऱ्यांशी वाटाघाटी करा मध्यस्थी नको ,,सौ कल्पनाताई पेचे

By : Mohan Bharti

गडचांदूर :- मुकुटबन येथील सिमेंट उद्योगाला लागणारा कच्चा माल कोठोडा व परसोडा परिसरातील जमिनीचे उत्खनन करुन मिळवणार आहे. या करीता या परिसरातील शेत जमीन सिमेंट उद्योगाला विकत घ्यायची असेल तर सरळ सरळ शेतकऱ्यांशी वाटाघाटी करुन शेत जमीन विकत घ्यावी शेत जमिनीचा सौदा मध्यस्थी द्वारा करु नये अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ कल्पनाताई उत्तमराव पेचे यांनी एका निवेदनातून केली आहे. आरसीसीपीएल (एम. पी. बिर्ला) वर्क्स कंपनी मुंबई यांनी यवतमाळ जिल्ह्य़ातील मुकुटबन येथे सिमेंट उद्योग उभारणी सुरु आहे. या कंपनीला सिमेंट करीता लागणारा (लाईम स्टोन) चुनखडी कोरपना तालुक्यातील परसोडा, कोठोडा (बु), कोठोडा (खु), गोविंदपुर,रायपूर या गावाची शेतजमीन विकत घेवुन कच्चा दगड मिळविण्यासाठी ७५६.१४ हेक्टर जमिनीची जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या कडे मागणी केली होती. या मागणीच्या आधारे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी 22 सप्टेंबर 2020 ला आनलाईन जनसुनावणी घेतली होती. यात माजी जि.प.सदस्य उत्तमराव पेचे यांनी एकरी पंचवीस लाख रुपये, एक सात बारा एक नौकरी, परीसरातील पाण्याची पातळी खालावु नये या करीता शेतातील बोअरवेल क्षतीग्रस्त होवु नये याची हमी व शेतकऱ्यांन सोबत वाटाघाटी करून शेत जमीन भूसंपादन करावे असा आक्षेप व सुचना केल्या होत्या या सुचना आक्षेपाची नोंद घेत त्यांच्या अनुपालन मध्ये प्रकल्प प्रवर्तकांनी भूसंपादन प्रक्रीया योग्य तो मोबदला शेतकऱ्यांनसोबतच वाटाघाटी करुनच करण्यात येईल. ब्लास्टिंग करताना सुरक्षतेचे पालन करण्यात येईल. स्थानिक लोकांना गुणवते नुसार नौकरी देण्यात येईल परंतु आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांन सोबत वाटाघाटी न करता मध्यस्थी च्या माध्यमातून खरेदी सुरु करण्यात आल्याचा आरोप एका निवेदनातून केला आहे. ही मध्यस्थी च्या माध्यमातून परस्पर विक्री थांबवावी. शेतकऱ्यांनसोबतच वाटाघाटी करून शेत जमीन भूसंपादन करावे अशी मागणी एका निवेदनातून तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपुर, उपविभागीय अधिकारी राजुरा, राजुराचे आमदार सुभाष धोटे, खासदार बाळु धानोरकर, यांना देण्यात आले आहे. तरी याची दखल घेवुन तात्काळ तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सौ कल्पनाताई उत्तमराव पेचे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here