गडचांदूर शहरातील महामार्गावरील जडवाहनांमुळे वाहतूक कोंडी युवक काँग्रेसचे ठाणेदारांना निवेदन आंदोलनाचा इशारा

By : Mohan Bharti

गडचांदूर : गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी प्रवेशद्वार ते गोपालपूर रोड पावतो तसेच राजीव गांधी चौक ते वीर बापूराव शेडमाके चौक पावेतो सिमेंट कंपनी मध्ये येणारे व जाणारे ट्रक महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या संख्येने राहत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, शहरात येणारा हा मुख्य मार्ग असल्याने दिवस रात्र या मार्गावर वाहतूक सुरु असते,या मार्गावर अनेकदा अपघात होऊन अनेकांचे प्राण गमवावे लागले, दर महिन्याला अपघात होतात, या महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत, एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहेत. पोलीस प्रशासन ने या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढून वाहतूक कोंडी होणार नाही ,अपघात होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गडचांदूर शहर काँग्रेस पक्षाचे वतीने पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनात केली आहेत. 7 दिवसात या समस्या सुटल्या नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे, शिष्टमंडळात युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष रुपेश चुदरी, माजी अध्यक्ष रोहित शिंगाडे,विधानसभा महासचिव प्रितम सातपुते,तालुका उपाध्यक्ष अतुल गोरे,राहुल थेरे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here