गडचांदूर येथे पोषण आहार अभियानाअंतर्गत जनजागृती संपन्न

By : Mohan Bharti

गडचांदूर : नगर परिषद गडचांदुर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील अंगणवाडी केंद्र क्रमांक 18 येथे पोषण आहार अभियानाअंतर्गत जन जागृती अभियान कार्यक्रम नगरसेवक तथा गटनेते विक्रम नामदेवराव येरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास प्रकल्प कार्यालय कोरपना अंतर्गत दरवर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा कालावधी “पोषण मास” म्हणून साजरा करण्यात येतो. विविध अंगणवाड्यांमध्ये शासनाच्या उपलब्ध सोयी सुविधां बाबत सदर कालवधीत जनजागृती करण्यात येत असते. आपल्या अध्यक्षीय भाषणात नगरसेवक विक्रम येरणे यांनी शासनाने लहान बालक गरोदर स्त्रिया व स्तनदा मांतांच्या संपूर्ण पोषणाची जवाबदारी स्वीकारली असून कुणालाही पोषण आहारापासून वंचित ठेवले जाणार नाही अशी माहिती दिली. कोरोना काळात अंगणवाड्या बंद असताना सुद्धा लाभार्थ्यांना घरपोच सुविधा पुरविल्या बद्दल सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे त्यांनी आभार मानले. नगर परिषद ने शहरात ११ ठिकाणी लहान मुलांकरिता खेळण्याचे साहित्य लावले असून त्यात अंगणवाडी केंद्रांना प्राधान्य देण्यात आले असून पुढे उर्वरित आंगणवाडी परिसरात खेळण्याचे साहित्य लावली जाणार असल्याचे सांगितले. गडचांदूर शहरातील अठरा ही अंगणवाड्या नगर परिषद ला हस्तांतरित झाल्यास अधिक आधुनिक सुविधा पुरविल्या जातील व त्याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात विविध पोषक आहारांचे प्रदर्शन आणि त्यांची बनवण्याची पाककृती उपस्थित महिलांना समजावून सांगण्यात आली. कार्यक्रमास सौ. ताराबाई तिखट, सौ. इंदिराबाई कोंडेकर, सौ. करिश्मा बांगडे, फातिमा बी, सौ. बाशुमिया सौ. ठाकरे, अंगणवाडी सेविका सौ. योगिता चिमणकर सौ. पुष्पा ठेपाले, सौ. सुनंदा चौधरी मदतनीस सरिता रहांगडले सोबतच स्तनदा माता, बालक व गरोदर महिला लाभार्थी उपस्थित होते. संचालन लता अहिरकर तथा आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका सौ. सुवर्णा गिरडकर यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *