महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथील सेवानिवृत्त शिक्षक पत्तीवार व कांबळे यांना भावपूर्ण निरोप

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथील एम सी व्ही सी विभागात कार्यरत पूर्ण वेळ शिक्षक(प्रात्यक्षिक)श्री बी,एस, पत्तीवार तसेच विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री शुद्धोधन कांबळे 31 मे ला सेवानिवृत्त झाल्याबद्दल महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ च्या वतीने शाल ,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करून निरोप देण्यात आला.
सत्कार समारंभ च्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ संचालक श्री विठ्ठलराव थिपे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे,मुख्याध्यापिका तथा प्राचार्या स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की,सत्कारमूर्ती बी एस पत्तीवार, व शुद्धोधन कांबळे होते.
उपस्थित मान्यवर अतिथी नी
सत्कारमूर्ती शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती शिक्षकानी सत्काराला उत्तर देताना शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,
याप्रसंगी बी,एस, पत्तीवार यांनी कनिष्ठ महाविद्यालय चा माजी होतकरू गरीब विद्यार्थी पुणे येथे उच्च शिक्षण घेत यु पी एस सी परीक्षेची तयारी करीत असलेल्या करण मेश्राम याला 21 हजार रुपयांची मदत जाहीर केली.
सत्कार मूर्ती चा परिचय एच बी मस्की यांनी करून दिला,संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली हेपट यांनी केले, याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *