भटके-विमुक्त हक्क परिषद विदर्भ विभाग च्या वतीने सहविचार सभा संपन्न

लोकदर्शन 👉 माहेशजी गिरी(नागपूर)


🔸*मा.श्री धनंजयजी ओंबासे सर प्रदेशाध्यक्ष भटके-विमुक्त हक्क परीषद महाराष्ट्र* यांच्या मार्गदर्शनाखाली

भटके-विमुक्त हक्क परिषद विभाग च्या वतीने सहविचार/चर्चा सभा दिनांक 12/09/ 2021 रविवार 11:00 ते 2: 30 पर्यंत स्थळ 13 पावनभूमी, सोमलवाडा, वर्धा रोड नागपूर येथे घेण्यात आली सभेचे *अध्यक्षस्थान डॉ. बबनराव तायवाडे सर (राष्ट्रीय अध्यक्ष- ओबीसी महासंघ, संचालक महा ज्योती संस्था महाराष्ट्र, सदस्य मागासवर्ग आयोग महाराष्ट्र)* यांनी भूषविले व *प्रमुख अतिथी डॉ. राजकुमार गोसावी मार्गदर्शक तसेच श्री महेश गिरी (अध्यक्ष विदर्भ विभाग)* यांनी भूषविले
यानंतर सहविचार सभेत समस्त भटके-विमुक्त परिषदेच्या परिचय करण्यात आला व त्यानंतर त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली नंतर डॉ. बबनराव तायवाडे सर यांनी योग्य मार्गदर्शन केले महाज्योती संस्था यांनी मागील वर्षात काय केले व पुढील भविष्यात काय करण्याच्या मानस विचाराधीन आहे ते सांगितले त्यातील निवडक मुद्दे खालील प्रमाणे
1) एमपीएससी यूपीएससी प्रिपरेशन परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे नियोजन

2) नीट(NEET) साठी मुलांना जी तारीख 15 सप्टेंबर होती ती 30 सप्टेंबर होणार

3) 40 % मुलांना स्किल डेव्हलपमेंट योजना आखणार

4) गोंधळी समाजातील दिलेल्या निवेदनावर ते म्हणाले की यावर मला योग्य योजना (प्रेझेंटेशन) बनवून द्या त्यावर विचार केला जाईल
5) शेतकऱ्यांना (ओईल सीड) तेलबियांचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन करणार त्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर अकोला, अमरावती, यवतमाळ, येथे तसे केंद्र उभारणार

6) ग्रामीण व शहरी भागातील महिलांना माॅडेल मशीनचा वापर करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना कापड देऊन त्यांच्याकडून संबंधित कपडे बनवुन घेऊन ते अनेक कापड कंपनीशी टायप करून ते विकण्यास मदत करणार

7) मोठे ट्रेलर ट्रक्स बाबत मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना कोल माईन्स इतर खाणी संदर्भात टायप करून त्यांना तेथे रोजगार निर्मिती करणार

8) संपूर्ण महाराष्ट्रात महाज्योती संबंधीचे टोल फ्री क्रमांक बनविणार

9) महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महाज्योतीचा योजनांच्या फलक लावणार

अशा अनेक महाज्योती संबंधित योजना बाबत तसेच भटक्या-विमुक्तांना यामध्ये जनजागृती करून समाविष्ट केले जाईल याबद्दल चर्चा झाली

सभेत डॉ.राजकुमार गोसावी सर यांनी मार्गदर्शन केले श्री महेश गिरीन
प्रदीप पुरी (कार्याध्यक्ष नागपूर), विजय आगरकर (सचिव नागपूर), प्रवीण पाचंगे (उपाध्यक्ष नागपूर), गोवर्धन बडगे (उपाध्यक्ष नागपूर), अंकित पवार (संघटक नागपूर) रमेश चव्हाण (संघटक वर्धा), हरीजी इंगळे (समाज सेवक जोगवा समिती), विजय गिरी (संघटक नागपूर), शैलेश खडके (ओबीसी संघटक) हे उपस्थित होते अशाप्रकारे सभा संपन्न झाली

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *