कळमना येथील महिलांनी गौरी पुजनातून केली रोगमुक्त गावासाठी प्रार्थना.

By : Mohan Bharti 

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे गौरी पुजन निमित्ताने सर्व महिलांनी गावातील रोग राई नष्ट होण्याची प्रार्थना केली. सध्या सर्वत्र मलेरिया, डेंग्यू आणि अन्य आजार वाढलेले आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे ग्रामीण जनतेचे हाल होत आहेत. अशा एक ना अनेक रोगापासून गावची मुक्ती व्हावी व गाव रोगमुक्त व्हावे यासाठी येथील महिलांनी गौरी पुजनातून प्रार्थना केली आहे. या प्रसंगी कळमनाचे उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रा. प सदस्य सुनीता ऊमाटे, रंजना पिंगे, संगीता ताजणे, संगीता अटकारे, पुष्पा पिंगे, कविता ईददे, वैशाली पिंगे, शारदा ताजने यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here