

विदर्भ महाविद्यालय जिवती येथील सांस्कृतिक, मराठी व इतिहास विभाग च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘कोरोना काळात शिक्षकांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले . सदर चर्चासत्र आभासी पद्धतीने घेण्यात आले. या चर्चासत्रात मुख्य मार्गदर्शक स्थानावरून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस एच शाक्य यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता कोरोना सदृश्य परिस्थितीत शिक्षक जे कार्य करत आहेत. त्या कार्याची प्रशंसा केली. सोबतच या युद्धजन्य परिस्थितीत इतरही काही घटक जे अहोरात्र परिस्थिती टाळण्याकरिता कार्य करत होती. डॉक्टर, पोलीस, नर्स या सर्वांचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केलेत. तसेच शिक्षकांची सुद्धा साथ महत्त्वाची होती. या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेकडे त्यांना प्रत्यक्षात न मिळणाऱ्या ज्ञानात भर, आभासी पद्धतीने मिळवून देणे तसेच त्यांच्या विविध समस्या व शंकाचे निराकरण करणे हे कार्य शिक्षकांने केलेत. या कठीण काळात विद्यार्थ्यांची मानसिकता व आरोग्य सुदृढ ठेवणे सोबतच समाजाला सुद्धा निरोगी, व अफावांपासून दूर ठेवण्यासाठी व ध्येयाप्रत जागृत राहून प्रगतिशील करण्याकरिता महत्त्वाची भूमिका शिक्षकांनी बजावण्याची गरज आहेत असे, प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शाक्य यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्या अनुषंगाने शिक्षक दिन च्या दिवशी चर्चासत्राचे आयोजन प्रा. गजानन राऊत, प्रा. डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राऊत तर समारोप प्रा. देशमुख यांनी केले.