एस. आर. पी. एफ. पोलीस भरती परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी.

आमदार सुभाष धोटे यांची महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघातील बरेच मुले-मुली मागील अनेक वर्षापासुन पोलीस भरतीसाठी तयारी करीत आहेत. सन २०१९ ला महापरीक्षा पोर्टल द्वारे S.R.P.F गट क्रमांक १८ यासाठी आवेदन केले होते. परंतु कालांतराने विद्यार्थ्यांच्या फार्म बद्दल डाटा जिंजर या कंपनीस हस्तांतरीत करण्यात आला होता. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना परीक्षा पासवर्ड आप. डि. अपडेट करण्यास कळविले असता विद्यार्थ्यांनी आय. डि आणि पासवर्ड चेंज केले. मात्र अधिवास प्रमाणपत्र अपडेट करण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे काही मोजक्याच मुलानी अधिवास प्रमाणपत्र अपडेट केले होते. केवळ त्याच मुलांचे परीक्षा हॉल टिकीट संकेतस्थळावर उपलब्ध होत आहेत आणि ज्या मुलांचे अधिवास अपडेट झालेले नाही त्यांना परीक्षेपासुन मुळावे लागत आहे. तसेच डोमेसियल अपडेट करण्याबद्दल विद्यार्थ्याच्या मेल तसेच मोबाईल क्रमांकावर कसलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती आणि ती पूर्वसूचना देण्याचे कर्तव्य प्रत्यक्षात त्या कंपनीचे होते. परंतु तसे न झाल्यामुळे मुलांना संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होत नाही आहेत. परीक्षा अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच येत्या ९ सप्टेंबर ला आहे. अवघ्या सात दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे सर्व चुकी जिंजर कंपनीची असल्याचे निदर्शनास येते. सदर चुकीमुळे एकूण २७००० विद्यार्थी पोलीस भरतीची परीक्षा देण्यापासुन वंचीत राहणार आहेत.
करीता विद्यार्थ्यांना काही दिवसांची मुदतवाढ अधिवास प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी देण्यात यावे जेणे करून विद्यार्थ्यांचे परिक्षा प्रमाणपत्र संकेत स्थळावर उपलब्ध होतील. याकरीता कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here