पोलिस भरती परिक्षा एस.आर.पी.एफ* *हॉल तिकीट संकेत स्‍थळावर उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्‍याकरिता दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी – आ. सुधीर मुनगंटीवार*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*🔶गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन सादर*

पोलिस भरती परिक्षा एस.आर.पी.एफ. चे हॉल तिकीट संकेत स्‍थळावर उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्‍याकरिता दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर मनपा सदस्य सचिन भोयर यांनी या विषयाकडे आ. मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आ. मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की दिनांक ९ सप्‍टेंबर २०२१ रोजी एस.आर.पी.एफ. पोलीस भरतीची परिक्षा होणार आहे. सदर परिक्षेचे काम जिजर या कंपनीकडे देण्‍यात आलेले आहे. सदर कंपनीद्वारे अधिवास प्रमाणपत्र अपडेट करण्‍याबाबत कोणतीही पूर्व सुचना देण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे काही मोजक्‍याच मुलांनी अधिवास प्रमाणपत्र अपडेट केले आहे. त्‍यामुळे केवळ या मुलांचेच परिक्षा प्रवेशपत्र संकेत स्‍थळावर उपलब्‍ध होत आहे. या परिक्षेमध्‍ये राज्‍यातील २७ हजार उमेदवार परिक्षा देणार आहे. परिक्षेकरिता बसलेल्‍या उर्वरित उमेदवारांना अधिकृत संकेत स्‍थळावर उपरोक्‍त तांत्रीक अडचणीमुळे प्रवेशपत्र उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरलेला असून परिक्षेपासून वंचित राहावे लागणार असल्‍याची भिती निर्माण झाली आहे. सदर परिक्षेकरिता फक्‍त ७ दिवसाचा कालावधी शिल्‍लक आहे. त्‍यामुळे उक्‍त परिक्षेला बसलेल्‍या उमेदवारांनी पोलीस भरती परिक्षा एस.आर.पी.एफ. चे हॉल तिकीट संकेत स्‍थळावर उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्‍याकरिता दोन दिवसाची मुदतवाढ मिळण्‍याची विनंती केली आहे. शासनाने उमेदवारांचे हित लक्षात घेता अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्‍याकरिता दोन दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय त्वरित जाहीर करावा अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *