आरएचपी म्हणजे रुग्ण हक्क परिषद! आरएचपी हॉस्पिटल म्हणजे रुग्णांच्या हक्काला प्राधान्य देणारे, एक भव्य दिव्य हॉस्पिटल!

लोकदर्शन 👉मोहन भारती( संकलन)

पुण्यातील कोंढवा भाग म्हणजे बहुसंख्येने असलेल्या मुस्लिम समाजातील लोकवस्तीचा प्रदेश! हातावर पोट असलेल्या गरीब – मध्यमवर्गीय कामगारांची संख्या इथे मोठी आहे. याच भागात रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सुरू केलेले ”आरएचपी हॉस्पिटल” आता राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. उमेश चव्हाण हे ‘डॉक्टर’ नाहीत की त्यांना ‘उद्योजकता’ किंवा ‘राजकिय’ घराणेशाहीचा वारसाही नाही, तरीही त्यांनी उभारलेली ”आरएचपी हॉस्पिटलची” वास्तू डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये लाखो रुग्णांना महागडे औषध उपचार मिळवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषद ही संघटना स्थापन करून उमेश चव्हाण यांनी सामान्य अतिसामान्य गोरगरीब नागरिकांना कोट्यावधी रुपयांचे उपचार मिळवून दिले, आणि पैसे नाहीत म्हणून उपचाराविना मरणाऱ्या असंख्य लोकांना जीवनदान दिले.
मागील दोन वर्षात साथीच्या रोगांचे चार लाख – आठ लाख रुपये असे कोरोनाचे बिल येत असताना त्या बिलांचे शासकीय पातळीवर लेखापरीक्षण झालं पाहिजे आणि लोकांकडून जादा लूट केलेली रक्कम रूग्णांना पुन्हा एकदा मिळाली पाहिजे. यासाठी त्यांनी उचललेली पावलं राज्यात दिशादर्शक ठरली आहेत. त्यातून अनेक लोकांना त्यांनी भरलेल्या बिलांचा परतावा देखील मिळाला आहे. यामुळेच संतापलेल्या चिडलेल्या एका हॉस्पिटल चालकाने उमेश चव्हाण यांना उद्देशून, ”तुम्ही स्वतः हॉस्पिटल काढून दाखवा. म्हणजे हॉस्पिटल चालविणे किती कठीण असतं ते तुम्हाला कळेल?” असे म्हटल्या बरोबरच रुग्ण हक्क परिषदेने स्थापन केलेल्या पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून उमेश चव्हाण यांनी निवडक सहकाऱ्यांच्या सोबतीने पुण्यातील धानोरी भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलची स्थापना केली. ५३ बेडच्या निर्माण केलेल्या हॉस्पिटलमध्ये सर्वच बेडला ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करून शेकडो नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम त्यांनी केले. यश म्हणजे या हॉस्पिटलमध्ये एकही मृत्यू झाला नाही आणि महत्वाचं म्हणाल तर पहिले आठ दिवस शासकीय नियमानुसार दर आकारणी केली तर उर्वरित ४५ दिवस हे हॉस्पिटल संपूर्णपणे मोफत चालवले. त्यांनी करोडो रुपयांची कमाई केली नाही. यातून ठरवलं तर धर्मादाय हॉस्पिटल मोफत चालवणे शक्य आहे, तथापि सर्वांनाच मोफत उपचार देणे शक्य नसले तरी गरजवंत गोरगरिबाला मोफत उपचार देणे शक्य असल्याचा वस्तुपाठ उमेश चव्हाण यांनी कृतीतून घालून दिला. रुग्णांच्या हक्कासाठी लढता लढताच हॉस्पिटल चालक होण्याचा अनुभव आणि हॉस्पिटल चालविण्याचे शिक्षण त्यांनी आत्मसात केले. त्यातूनच रुग्णांच्या हक्काला प्राधान्य देणारे रुग्ण हक्क परिषदेचे कोंढवा येथील आरएचपी हॉस्पिटल २५ जुलै २०२१ पासून राज्यभरातील असंख्य नागरिकांसाठी तयार केले गेले आहे.
आरएचपी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि सर्वच प्रकारचे उपचार केले जातात. दहा हजार स्क्वेअर फुटाचा एक मजला प्रमाणे सहा मजले असणारी हॉस्पिटलची भव्य दिव्य इमारत रुग्णांच्या हक्काला प्राधान्य देणाऱ्या देशव्यापी प्रकल्पाचे एक अनोखे ‘मॉडेल’ ठरले आहे.
कमालीची स्वच्छता, उत्तम प्रकाश व्यवस्था, खेळती हवा, पंचतारांकित वैद्यकीय फर्निचरसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरलेले अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज असलेले ऑपरेशन थिएटर, सुसज्ज जनरल वॉर्ड, भव्य अशा खाजगी आणि निमखाजगी रुग्णसेवेसाठीच्या खोल्या ( प्रायव्हेट रूम) सोबतीला प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुप्रसिद्ध कुशल डॉक्टरांची टीम यामुळे रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी आणि सर्व प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत. आमदार खासदार किंवा कुठल्याही मंत्रीपदावर नसताना रुग्ण हक्क परिषदेची स्थापना करून समान्यातीलच एक असणारे उमेश चव्हाण असामान्य ठरले आहेत. त्यांनी निर्माण केलेले हे आरएचपी हॉस्पिटल महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा खोवून डाम-डौलाने आपली पताका फडकवित आहे. अनेक सृजनशील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट देऊन या हॉस्पिटल प्रकल्पाचे कौतुक केले आहे. ‘आरएचपी हॉस्पिटल’ जसे पुण्यात उभे राहिले तशाच पद्धतीने त्याच्या प्रत्येक जिल्हा स्तरावर शाखा उभ्या रहाव्यात यासाठी उमेश चव्हाण, त्यांचे सहकारी आणि रुग्ण हक्क परिषदेला अनेकोत्तम शुभेच्छा!

‘आरएचपी हॉस्पिटल’
स.न. ५३, मक्का मस्जिद जवळ, भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, पुणे – ४८
फोन नं.- 8956185706 – 07

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *