

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर
संगणकाचे ज्ञान असणे ही आजच्या काळाची गरज असून प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या वापर होत असतो. परिसरातील बऱ्याच गरीब विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, याकरीता अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाऊंडेशन द्वारे तीन महिन्याचे एमएस-सीआयटी चे प्रशिक्षण या भागातील युवकांना सुरु करण्यात आले.
ज्यामध्ये संगणकाचे ज्ञान तसेच त्याच्या वापर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक तसेच रोजगार करिता उपयुक्त होणार आहे. अल्ट्राटेक फाउंडेशनद्वारे 90 विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून एक नवीन दिशा देण्याचे काम करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मोहर्ष कॅम्पुटर, नांदा फाटा येथे प्रशिक्षण देण्यात येत असुन तेथेच त्यांची परीक्षासुद्धा घेतली जाणार आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस भरती तसेच सर्व शासकीय, निमशासकीय विभागाच्या भरतीमध्ये या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.