राजुरा आसिफाबाद हैद्राबाद मार्गावरील रेल्वे गेट नं LC NO. 3-OH बा (UNDER BRIDGHT) बोगदा बनविण्यात यावा.

लोकदर्शन 👉मोहन भारती

♦️नगराध्यक्ष अरुण धोटे यांची खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

राजुरा  :– शहरामध्ये राजुरा – आसीफाबाद- हैदराबाद हा राज्य महामार्ग आहे. यामार्गावरती माल वाहतूक करणा-या एक रेल्वे गाड्यांचा गेट आहे. त्या रेल्वे ट्रॅक वरून मानिकगड सिमेट, अंबुजा सिंमेट, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिंमेट तसेच सास्ती रेल्वे साईडींग, पांढरपौनी रेल्वे साइडिंग येथील सिंमेट कोळसा वाहतूक होत असते. या वाहतूकीमूळे दिवसभरात १० ते १५ वेळा प्रत्येकी १५ ते २० मिनिटा करीता रेल्वे गेट बंद असते. आणी त्या रेल्वे गेट च्या पलीकडे श्री. शिवाजी महाविदयालय आय. टी. आय. कॉलेज, टेक्नीकल कॉलेज, बस आगार राजुरा शहरातील प्रमुख बाग. आदर्श विदयालय, एम.एस.ई.बी. पॉवर हाऊस. आदिवासी मूला मुलींचे वस्तीगृह, व्यापारी भवन, सुतार समाजाचे समाज भवन आहे. त्या गेट पलीकडे येवढी मोठी रहदारी असल्यामुळे नागरिकानां विदयार्थ्यांना व्यापा-यांना कर्मचा-यांना प्रवासाचा खूप त्रास होत आहे. या रोडाच्या उजव्या बाजूस रेडिमेड बोगदा आहे. आपण एक तरुण तडफदार कर्तव्यदक्ष : खासदार आहात. आपल्या कडुन सदर कामाची अपेक्षा आहे. आपण काम करून देतो म्हणून घोषणा सुदधा केली होती म्हणून सदर बोगदयाचे काम त्वरीत पूर्ण करावे हि विनंती नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *