भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या प्रयत्नांतून मिळालेल्या DBT योजना अर्ज भरणे मुदत वाढ बाबत

  • लोकदर्शन प्रतिनिधी👉 किरण कांबळे

DBT योजने करिता अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२२ देण्यात आली होती.
परंतू तो पर्यंत विद्यार्थ्यांची कॉलेज प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी बेमुदत संप पुकारला होता.
या सर्व गोंधळात शासकिय दाखले मिळण्यात आणि सोबतच ग्रामीण भागात बस सुविधा नसल्याने संबंधीत प्रक्रिये मध्ये हालचाली करण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या.

या करिता २८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत न ठेवता मुदत वाढ द्यावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य द्वारे करण्यात आली होती.

आणि आज अखेर या मागणीला यश येत, ही मुदत वाढवून ३१ मार्च करण्यात आलेली आहे त्या बद्दल मा. धनंजय मुंडे साहेब यांचे आभार.

मा. किरण कांबळे (महासचिव, कॉलेज एवं विश्वविद्यालय भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांनी या विषयाला न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेतली या बद्दल खूप कौतुक…

कोल्हापूर समाज कल्याण आयुक्त मा. विशाल लोंढे यांनी केलेल्या सहकार्य आणि मार्गदर्शना बद्दल त्यांचे आभार…

हि मागणी उचलून धरण्यासाठी सोशल मिडिया आणि न्यूज मीडिया ने जे सहकार्य केले त्या बद्दल सर्व पत्रकार बंधूंचे आभार 🙏

विद्यार्थ्यांचा न्याय हक्कासाठी आणि शिव फुले शाहू आंबडकरांच्या विचारांचे विद्यार्थी घडवण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा सदैव तत्पर आहे.

भारतीय विद्यार्थी मोर्चा सोबत जुळण्यासाठी संपर्क :- +91 87678 92260 (केंद्रिय सचिवालय नागपूर)

आपला,
योगेश शशिकांत थोरात
प्रदेश अध्यक्ष in,
भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *