Home
Home सामाजिक साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात यांचे स्मारक शासनाने उभारवे !÷ आयु . विलास...

साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात यांचे स्मारक शासनाने उभारवे !÷ आयु . विलास खरात सचिव साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी ता. आटपाटी

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात


आयु . विलास खरात सचिव साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी ता. आटपाटी जि. सांगली कडून मा. रघुनाथ मेटकरी साहेब, अध्यक्ष साहित्य सेवा मंडळ, विटा यांना ४० वे ग्रामीण मराठी साहित्य सम्मेलनं, विटा ता. खानापूर
, जि. सांगली येथे दिनांक ३ मार्च २०२२ रोजी थोर साहित्त्यिक डॉ. शंकरराव खरात ह्यांचा कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने उभे करावे अशी विनंती केली आहे.

थोर साहित्त्यिक डॉक्टर शंकर राव खरात हे १९८४ साली जळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगवादचे कुलगुरू होते. “तराळ-अंतराळ, आत्मचिरित्र भाष्यकार , बारा बलुतेदार, माणुसकीची हाक” अश्या अनेक कादंबऱ्याकथा लिहिलेल्या आहेत. त्या मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या आहेत. त्यांनी संपादक, बँक ऑफ इंडिया, रेल्वे बोर्डाचे चेअरमन आदी अनेक पद त्यांनी भूविलेली आहेत.. मराठी साहित्य विश्वातील नामवंत साहित्यकार डॉ. शंकरराव खरात यांचे नाव गणले जात आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावचे सुपुत्र आहेत. म्हणून आटपाटी ह्या त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने उभे करावे अशी मागणी महाराष्ट्रातील साहित्यिक विचारवंत व जनतेतून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here