राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

By : Mohan Bharti

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चित्रकूटमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरु असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक समाप्त झाली. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून, विशेष म्हणजे आता देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे.
तसेच संघ संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधीक लोकांपर्यंत संघाचे काम पोहचवण्यासाठी संघाने आयटी सेल सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्यांना या माध्यमातून संधी देण्यात येणार असून, RSS चा आयटी सेल हा भाजपाच्या आयटी सेल पेक्षा वेगळा असेल.
प्रचारकांच्या माध्यमातून संघाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर संघाने कू या अ‍ॅपलाही पसंती दिल्याचे सांगितले जात आहे. RSS कू या भारतीय बनावटीच्या अ‍ॅपपासून ते प्रतिष्ठित सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन आपल्या कामाचा प्रचार सुरु करणार आहे. तसेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील १२.७० कोटी कुटुंबांनी योगदान दिले आहे. राम मंदिरासाठी एका रुपयाचेही दान दिलेल्या व्यक्तींना वा कुटुंबांशी RSS संपर्क करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी लवकरच एक अभियान सुरू केले जाणार आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *