

.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपिपरी :– २५ जून २०२१
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरी येथे मक्का खरेदी केंद्राचे विधिवत पूजन करून मक्का खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. शासकीय धान्य गोंडावून गोंडपिपरी येथे हे मक्का खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रसंगी स्थानिक शेतकरी आनंदराव गौरकर व धुळसे यांना शाल व श्रीफळ देऊन आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी कृ उ बा स सभापती सुरेश चौधरी, संभू येल्लेकर, अन्न पूरवटा निरिक्षक मेश्राम, गौतम झाडे, आशीर्वाद पिपरे, सचिन फुलझले, अभय शेंडे, मजीद कुरेशी, अजय बोटरे यासह शेतकरी उपस्थित होते.