आणीबाणीच्या निषेधार्थ गडचांदुर भाजपाच्या वतीने पाळला काळा दिवस


⭕मिसा कायद्या अंतरर्गत अटक करण्यात आलेल्या आंदोलन कर्त्याचा सत्कार संपन्न.

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

गडचांदुर — शुक्रवार २५ जून रोजी पेट्रोल पम्प चौकात १२.०० वाजता विकास पुरूष माजी वित्त नियोजन मंत्रि मा.सुधिरभाऊ मुनगंटिवार,माजी केंद्रिय गृहराज्य मंत्री मा्.हंसराज भैय्या अहीर यांच्या सुचनेनुसार गडचांदुर भारतीय जनता पार्टी च्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला.
२५ जून १९७५ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी २५ जुन १९७५ च्या मध्य रात्री आणीबाणी लावली व ती पुढे २१ महीने ते २१ मार्च १९७७ पर्यंत होती.ईंदिराजींनी सत्तेसाठी भारतीय लोकशाहीचा खून करण्याचा पातक केला आहे. अभिव्यक्तीची कलम रद्द केली, मिसा कायदा आणला ,जीविताचा अधिकार संपविला, लोकशाहीचा चौथा स्तंभ समजणाऱ्या वर्तमान पत्रावर बंदी आणली. विरोधकांना झोपेतुन उचलुन जेल मध्ये टाकले. एवढेच नव्हे तर अनेक लोकांचा अमानुष छळ केला गेला. अनेक महिने तुरुंगात ठेवले. पवित्र अशा संविधानाचा अवमान करत संपूर्ण देशाला हुकूमशाहीच्या काळ्याकुट्ट अंधारात ढकलणाऱ्या इंदिरा सरकारचा आणि सामान्य भारतीयांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या त्या आणीबाणीचा निषेध करण्यात आला. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन केली तेव्हा त्या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या नागरीकांना मारझोड करून तुरुंगात डांबले त्या पैकी पु्र्वि बिहारचे रहवासी असलेले हल्ली गडचांदुर येथे वास्तव्यास असलेले श्री महेशजी शर्मा यांचा शाल श्रीफळ ,वाफारा मशीन देवुन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी महेशजी शर्मा यांनी त्यावेळेस झालेल्या अत्याचार ,अन्याय,हुकुमशाही,दडपशाही विषयी माहीती दिली.तसेच शहर अधक्ष सतीश उपलेंचवार ,गोपालजी मालपाणी,प्राचार्य शेख मेहताबसर नगरसेवक अरविंदजी डोहे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार नगरसेवक अरविंद डोहे गोपाल मालपाणी शहर महामंत्री हरीश घोरे नगरसेवक रामसेवक मोरे जेष्ठनेते महादेव एकर संदीपजी शेरकी कृष्णा भागवत हेमंत पातुरकर अरुण विधाते भास्कर उरकुंडे गणपत बुरडकर अरविंद कोरे युवा मोर्चाचे इम्रान शेख अजीम बेग युवा तालुका अध्यक्ष रोहन काकडे उपस्थित होते प्रास्ताविक अरविंद डोहे यांनी तर आभार संदीप शेरकी यांनी मानले

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *