गडचांदूर शहर भाजपातर्फे कोरोना यौद्धा पत्रकारांचा सत्कार

By : Mohan Bharti
कोरोनाने शहरात व परिसरात अक्षरशः थैमान घातले.अशा महा भयानक काळात कोरोना योध्दा म्हणून पत्रकार आपल्या स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता अविरत कार्य करीत आहे. त्यामुळे अशा कोरोना योध्दाचा भारतीय जनता पार्टीकतर्फे सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कोरोना योध्दाचा सत्कार करुन त्यांचे मनोबल वाढविण्याच्या सूचना वित्त व नियोजन मंत्री तथा लोकलेखा समीतीचे अध्यक्ष सुधिरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज भैय्या अहीर यांनी सुचना केल्या. त्यानुसार माजी आमदार संजयभाऊ धोटे, भाजपा जिल्हाधक्ष देवराव भोंगळे, जिल्हा भाजपा महीला अध्यक्ष अल्काताई आत्राम यांच्या मार्गदशनाखाली शहरातील पत्रकारांचा भाजपाच्या वतीने कोरोना यौद्धा म्हणून पौष्टिक फळे, मास्क, छत्री व होमिओपॅथी आर्सेनिक गोळ्या भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलंचिवार, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, संदीप शेरकी तथा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना यौद्धा म्हणून पत्रकारांचा सत्कार केल्या बद्द्ल पत्रकारांनी भाजपाचे आभार मानले. प्रास्ताविक भाजपचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार यांनी केले, संचालन नगरसेवक अरविंद डोहे यांनी केले तर आभार संदीप शेरकी यांनी मानले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *