सोनूर्ली येथे महात्मा गांधी विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथे दि.३१/०५/२०२१ ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली, तसेच महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथील कर्तव्य दक्ष शिक्षक श्री.विनोद एकरे हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्याप्रसंगी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक शरद जोगी होते.सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.श्री.विनोद एकरे यांना सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे संचालन पद्माकर खैरे यांनी केले, आभार प्रदर्शन दत्ता येडमे,यांनी केले, कार्यक्रमाला प्रभूदास वासाडे,रामकृष्ण परसुटकर,पद्माकर खैरे,दत्ता येडमे,वामन सोनपितरे ,उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *