सरकारने आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ !

दि 3 /4/2021 मोहन भारती
आधारकार्ड (Adhaar Card) आणि पॅनकार्ड (Pan Card) लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख सरकारकडून देण्यात आली होती.
त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर आधार आणि पॅन लिंक करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, यातल्या अनेक नागरिकांना हे करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर सरकारने ही मुदत अजून वाढवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
अखेर केंद्र सरकारने ही मुदत आता ३० जून २०२१ पर्यंत वाढवली आहे.
त्यामुळे ज्यांना आधार,पॅन लिंग ( Adhaar-Pan Link) करता आलेले नाही,
त्यांना ३० जूनपर्यंत ते करता येणार आहे.
करोना परिस्थितीमुळे वाढवली मुदत करोना काळात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
त्यातच कोविड-१९च्या काळात काही भागांमध्ये लॉकडाऊन तर काही भागांमध्ये कठोर निर्बंध घालून देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना सामना कराव्या लागत असलेल्या परिस्थितीमध्ये ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात येत असल्याचं आयकर विभागाकडून ट्वीट करून जाहीर करण्यात आलं आहे.
आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश आधारकार्ड
(Adhaar Card )
आणि पॅनकार्ड
(Pan Card)
लिंक करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचा प्रयत्न केला.
अनेक व्यक्तींनी एकाच वेळी वेबसाईट विझिट केल्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली.
त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
अनेक नेटिझन्सनी ट्वीटरवर आपल्या अडचणी शेअर देखील केल्या होत्या.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *