भाजपा ची वन बुथ थरटी युथ ची बैठक कन्हाळगाव येथे संपन्न

 

 

 

By : Shivaji selokar
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतिने कन्हळगांव येथे दिं 02-04-2021रोज शुक्रवार ला बुथ क्रमांक (६) सहा च्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत वन बुथ थर्टी युथ ची बैठक घेण्यात आली. यामध्ये बुथ प्रमुख ते तिस बुथ समितीचे पदाधिकारी नेमण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते. बूथ प्रमुख राजू येरेकर यांनी 30 बुथ सदस्यांच्या समितीचा फार्म भरून श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष यांना बैठकीत देण्यात आला. श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बूथ प्रमुख हा चांगल्या प्रकारे काम करणारा प्रमुख व्यक्ती म्हणून निवडला जातो तसेच इतर समितीच्या सदस्यांची सुद्धा जबाबदारी तेवढीच असते बुथ हा निवडणुकीचा महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येकाने निवडणूक जिंकावी हाच उद्देश ठेवून बुथ वर आपलं काम करावं अशी विनंती केली व बुथ प्रमुख,नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बैठकीला गावातील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन बूथ प्रमुख राजू येरेकर यांनी केले तर आभार दिवाकर गेडाम यांनी मानले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *