संत्रानगरीत ‘भा’ चित्रपटाची निर्मिती

By : Shankar Tadas, Chandrapur
* चंद्रपूरचे कलावंत सहभागी
संत्रानगरी नागपूरला ‘नागीवूड’ म्हणूनही ओळखले जाते. या नागीवूडमध्ये चित्रपट निर्मितीला गती आली आली. मुंबईचे निर्माता, दिग्दर्शकही नागपूरकडे वळत आहेत. स्थानिक कलावंतांच्या गुणांना वाव मिळत असून नागपूरचे निर्माताही चित्रपट निर्मितीसाठी पुढे आले आहेत. याचाच एक भाग म्हणून इम्पिड्स सिने सोल्युशन्स, धिराल एंटरटेनमेंट्स व सईद अख्तर यांनी नाथे पब्लिकेशन लिमिटेडचे संचालक श्री. संजय नाथे यांच्या सहकार्याने होणा-या चित्रपट निर्मिती कार्याची दखल घेतली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि भारतीय सभ्यतेवर भाष्य करणारा ‘भा’ हा मराठी चित्रपट तयार होत आहे.

अलीकडेच 26 डिसेंबरपासून ‘भा’चे चित्रीकरण सुरू झाले. श्री. संजय नाथे, श्री गाणारसाहेब, बोरखेडीचे सरपंच श्री. राजूभाऊ घाटे, ख्वाजासाहेब आणि अश्विनी पारधी यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.
त्यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ‘भा’ या चित्रपटाची कथा-पटकथा सईद अख्तर यांची असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शकही आहेत. 53 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील ‘हलाल’ या चित्रपटासाठी सईद अख्तर यांना उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता, तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘भोंगा’ या चित्रपटाचे कथानक त्यांचे होते. ‘भा’च्या छायाचित्रणाची जबाबदारी अक्षय सावरकर सांभाळणार असून संगीत विजय गटलेवार यांचे आहेत. सहदिग्दर्शक आकाश दुधनकर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर मिथिलेश गाणार, तर मंदार गुजर प्रॉडक्शन मॅनेजर आहेत. लाईट्सची जबाबदारीमुळे लाईट्सचे प्रकाश मुळे सांभाळणार आहेत. या चित्रपटात प्रेम धिराल, कल्याणी व्यंकटेश व चाहत विश्वकर्मा यांच्या प्रमुख भूमिका असून अन्य कलावंतांमध्ये विनोद राऊत, डॉ. जयश्री कापसे-गावंडे, प्रदीप रोंगे, नितीन पात्रीकर, सुबोध पवार, पवन वैद्य, श्याम आस्करकर, संयोनी मिश्रा, के. राजू, मिथिलेश गाणार, रमेश चवळे, अब्दुल कदिर बख्श, हरीश तलमले, प्रवीण वाटकर, वैभव भगत आदींचा समावेश आहे. बोरखेडी परिसरात ‘भा’ चे चित्रीकरण सुरू आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *