कोरपना येथे आमदार सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेत दक्षता समितीची बैठक संपन्न.

कोरपना दि 18/ 3/2021 मोहन भारती-
तहसील कार्यालय कोरपना येते सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समिती बैठक घेण्यात आली. दक्षता समिती अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी तालुक्यातील राशन पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. सोबतच तहसीलदार एम वाकलेकर, गंभीरे मॅडम तसेच अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी यांना धान्य वाटपात येणाऱ्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवून सर्व लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे निर्देश दिले.
या प्रसंगी जेष्ठ नेते विजयराव बावणे, नगराध्यक्षा सविता टेकाम, गंभीरे मॅडम, सरिता पोडे, रुंद्रा सिडाम, गौतम निरांजने, अनिल मेश्राम, उषा चौधरी, देवराव सोनटक्के, वामन भिवापूर, विलास मडावी, आशा मडावी, अर्चना वांढरे, भरती मडावी, रामसेवक मोरे, व्दारकाबाई पिंपळकर, आकाश वराटे, अरविंद मेश्राम, शारदा पांडे, साबीर कुरेशी, रत्नमाला ताडे, प्रा. आशिष देरकर, प्रा. उमेश राजुरकर यासह कोरपना तालुक्यातील रास्तभव दुकाणदार उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *