स्वरूप फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

खास महिलांसाठी आयोजित रोजगार मेळावा

महिलांनी पुढे यावं असं नेहमी म्हंटलं जातं पण पुढे येण्यासाठी त्यांना साथ हवी असते भक्कम पाठिंब्याची. “चुलं आणि मुलं” हे सूत्र कधीच महिलांच्या वाटेपासून सुटणार नाही आजही व भविष्यादेखील. त्यामुळेच घरात राहून स्त्रियांनी त्यांचा वेळ उगाचच वाया न घालवता उद्योग क्षेत्रात येऊन घरबसल्या रोजगार करावा या हेतूने पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथील स्वरूप फाउंडेशन महिला उद्योग समूह अंतर्गत पिंपरी- चिंचवड मधील बचत गटातील महिलांना रोजगार प्राप्ती ची सुवर्ण संधी लवकरच निर्माण करून देण्यात येणार आहे.

त्यासाठी उदया दि १८ मार्च, २०२१ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता स्वरुप फाउंडेशन महिला उद्योगसमूह अंतर्गत महिला रोजगार मेळावा साधुराम गार्डन गंधर्व नगरी सेक्टर नं. ५, मोशी पुणे नाशिक हायवे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र ४१२१०५ येथे आयोजित केला जात आहे तरी देखील सर्व महिलांनी ह्या मेळाव्यास उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वरूप फाउंडेशनचे प्रमुख प्रशांत सस्ते यांनी केले आहे. या मेळाव्यासाठी येताना प्रत्येक महिलांनी सोबत आधार कार्ड आणि स्वतःचा एक पासपोर्ट साईझ फोटो आणावा. अशी विनंती देखील स्वरूप फाउंडेशन कडून करण्यात आली आहे.

©शुभम शंकर पेडामकर

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *