छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

by : Shankar Tadas

गडचांदूर /कोरपना : नगरपरिषद गडचांदूर व आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने गडचांदूर येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवजयंतीच्या निमित्ताने पार पडले.
पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख अरुण निमजे, नगराध्यक्ष सविता टेकाम, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यावेळी मंचावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here