नारंडा येथील रंगमंचाचे बांधकाम पूर्ण करा : दालमिया सिमेंट कंपनीकडे मागणी

By : Shankar Tadas

कोरपना : तालुक्यातील नारंडा येथील जिल्हा परिषद शाळेजवळील रंगमंच्याचे बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. परंतु सदर बांधकाम हे अपूर्ण राहिले. त्यामुळे सदर रंगमंचावर कार्यक्रम घेणे अडचणीचे जात होते तसेच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात सदर रंगमंच येत असून शाळेचे विविध कार्यक्रम सदर ठिकाणी होत असतात तसेच गावातील वर्षभरात अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात परंतु रंगमंचाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी कार्यक्रम घेताना गावातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे सदर बाबीची दखल घेत ग्रामपंचायत नारंडा तर्फे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सदर अपूर्ण रंगमंचाचे बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भात दालमिया सिमेंट कंपनीचे युनिट हेड श्री. सुब्बा रायडू साहेब यांना निवेदन सादर केले व दालमिया सिमेंट कंपनीच्या सीएसआर निधी अंतर्गत सदर अपूर्ण रंगमंचाचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे यासंदर्भात त्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली सदर मागणी पूर्ण झाल्यास रंगमंचाचे बांधकाम पूर्ण होऊन गावातील नागरिकांचे होणारी गैरसोयी दूर होणार व त्या ठिकाणी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व क्रीडा कार्यक्रम घेण्यास मदत होईल सदर रंगमंचाचे बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून उचित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन कंपनी प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here