लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चंद्रपूर अंतर्गत राजुरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ९३० डी ते सिद्धेश्वर ग्रा. म. रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करणे अंदाजे किंमत ९५. १४ लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपुजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी जेष्ठ नेते हमीदभाई, शंकर बोंकुर, देवडा चे सरपंच शंकर मडावी, ग्रा प सदस्य राजकुमार मेकलवर, प्रतिमा मेश्राम, रामबाई सोनुले, तिरपती मेश्राम, राधेश्याम कुर्मावार, अब्दुल जमीर माजी सदस्य प.स. राजुरा,पूर्ण सेट , मोहमद आफसर सोंडो, चांदर्भान आडे अध्यक्ष seva सहकार देवाडा, मंजुषा अनमुलवार, शंकर बोलुरवार, चंद्रभान आडे, जांगु आडे, विनोद रतंकर यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.