गडचांदुर येथील नामांकित स्थानीय आदित्य बिरला पब्लिक स्कूल येथे २२ डिसेंबर, 2023 ला महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस हर्षोल्लासाने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या अर्चना गोलछा, पालक प्रतिनिधि श्रीमती स्मिता राठी व गणित विभागातील शिक्षकाद्वारे माता सरस्वती व रामानुजन यांच्या प्रतिमेवर माल्याअर्पण करून करण्यात आली. गणित विभाग प्रमुख अरविंद यादव यांनी गणित विषयाच्या महत्वाबद्दल प्रकाश टाकला. शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य,लघु-नाटिका,गीत, अंक-खेळ इत्यादि कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी, शिक्षक यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मधुकर धारपुरे यांनी केले. प्राचार्यानी सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे यशस्वी कार्यक्रमासाठी कौतुक केले.
Related Posts
भाजपाचे महाघाडी सरकारच्या विरुध्द आंदोलन
संवेदनाशून्य, भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस विभागाला १०० कोटी रु जमा करून देण्याचे टार्गेट दिले होते अशा भ्रष्ट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे.…
नायब तहसीलदार यांचा अनागोंदी कारभार
लोकदर्शन 👉 सतीश बिडकर *⭕श्रावणबाळ निराधार योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना बीपीएल दाखल्याची केली सक्ती प्रहारच्या बिडकर यांचा आरोप* नव्याने रुजू झालेले कोरपना तहसील चे नायब तहसीलदार यांच्या कार्यप्रणाली वर कोरपना तालुक्यात चर्चेचा…
इन्फंट कान्व्हेंट येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन.
लोकदर्शन👉मोहन भारती राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी योगदिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल…