ए. बी. पि. एस. गडचांदुर येथे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*

गडचांदुर येथील नामांकित स्थानीय आदित्य बिरला पब्लिक स्कूल येथे २२ डिसेंबर, 2023 ला महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस हर्षोल्लासाने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या अर्चना गोलछा, पालक प्रतिनिधि श्रीमती स्मिता राठी व गणित विभागातील शिक्षकाद्वारे माता सरस्वती व रामानुजन यांच्या प्रतिमेवर माल्याअर्पण करून करण्यात आली. गणित विभाग प्रमुख अरविंद यादव यांनी गणित विषयाच्या महत्वाबद्दल प्रकाश टाकला. शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य,लघु-नाटिका,गीत, अंक-खेळ इत्यादि कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी, शिक्षक यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मधुकर धारपुरे यांनी केले. प्राचार्यानी सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे यशस्वी कार्यक्रमासाठी कौतुक केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *