Home
Home Breaking News कळमना येथे आदर्श विद्यार्थी स्वप्निल वाढई च्या हस्ते ध्वजारोहण. ♦️उपक्रमशील सरपंच...

कळमना येथे आदर्श विद्यार्थी स्वप्निल वाढई च्या हस्ते ध्वजारोहण. ♦️उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ग्रामपंचायत येथे ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कळमना चे उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपला ध्वजारोहणाचा मान कळमना येथील आदर्श, होतकरू विद्यार्थी स्वप्निल मारोती वाढई यांना देवून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच नंदकिशोर वाढई हे कळमना येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. ते गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते असून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज विद्यार्थी दशेत प्रचंड मेहनत करून शिक्षण पूर्ण करणाऱ्या, कमी वयात कुटूंबाची जबाबदारी घेणाऱ्या स्वप्नीलला सरपंचांनी ध्वजारोहण करण्याचा मान दिला. निश्चितपणे यातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल याची खात्री सरपंच नंदकिशोर वाढई यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, रंजना पिंगे, सुनीता उमाटे, ग्रामसेवक मरापे, माजी पोलीस पाटील भाऊजी वाढई, माजी उपसरपंच महादेव ताजणे, मुख्याधापक धानकुटे सर, उध्दव आसवले, देवराव वांढरे, धरमज फाउंडेशनचे वाघ साहेब, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पिपळशेंडे, देवाजी पाटील चापले, अनिल मेश्राम, महादेव आबिलकर, मारोती बल्की, नत्थु वडस्कर, महिला प्रभात संघ अध्यक्ष मिना भोयर, मनिषा आबिलकर, गोखरे मॅडम , दुधे मॅडम , संगिता उमाटे, लता क्षीरसागर, कल्पना क्षिरसागर, शांताबाई विददे, सपना मेक्षाम, शिपाई सुनिल मेक्षाम, विशाल नागोसे यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here