Home
Home Breaking News खाजगी अनुदानित शाळा तुकडी बदली नियमा वरील स्थगिती उठविण्या संदर्भात शिक्षक आमदारांना...

खाजगी अनुदानित शाळा तुकडी बदली नियमा वरील स्थगिती उठविण्या संदर्भात शिक्षक आमदारांना निवेदन*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर :-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राज्यातील खाजगी विनाअनुदानित वरून अनुदानितवर शाळा किंवा तुकडी बदली प्रक्रियेवर, १ डिसेंबर ला शासनाने तूर्त स्थगिती दिली.
खाजगी विनानुदानित वरून अनुदानित शाळा किंवा तुकडी वर बदली करण्याबाबतचा शासन निर्णया ला तूर्त स्थगीती दिल्याने ,विनाअनुदानित तत्वावर १५ ते १६ वर्षा पेक्षा अधिक वर्षे निस्वार्थ पणे कार्य करणाऱ्या विनाअनुदानित तत्वावर कार्य करणाऱ्या शिक्षकांवर मोठे संकट आले असून शिक्षकांच्या भवितव्याचा विचार करून तूर्त स्थगिती हटविण्यात यावी व गेल्या कित्येक वर्षापासून कार्य करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी नागपूर विभाग चे नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे, निवेदन देताना लीलाधर मत्ते,आडे,आत्राम, व शिक्षक उपस्थित होते.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here