Home
Home Breaking News कोरपना तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने गॅस दरवाढीचा निषेध ,,,,,,,,,,,,,, ♦️तहसीलदाराना निवेदन सादर

कोरपना तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने गॅस दरवाढीचा निषेध ,,,,,,,,,,,,,, ♦️तहसीलदाराना निवेदन सादर

लोकदर्शन 👉 मोहन.भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुका कॉग्रेस पक्षाच्या वतीने गॅस दरवाढ व इतर समस्या संदर्भात मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मा तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले,
केंद्र सरकारने पुन्हा घरगुती गॅस व व्यवसायीक सिलेंडर गॅस रू.50/ व रू.150/दर वाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडून गेले आहे.
शेतकऱ्यांचा कापसाचे भाव प्रती क्विंटल रू 7000/ते रू7500/प्रमाणे खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आधारभूत खर्चाच्या दुपटीने म्हणजे प्रती क्विंटल रू 12000/देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
अंतोदय चे रेशन कार्ड प्राधान्ये कुटुंब यांना रेशन कार्ड तयार करून त्यांना धान्य देण्यात यावे.
शेतकऱ्यांच्या शेत जमिनी शासनाच्या चुकी मुळे वर्ग एक च्या जमिनी वर्ग दोन झाल्या त्या जमिनी तहसील कार्यालय कोरपना येथे प्रलंबित वर्ग एक चे प्रकरण तत्काळ निकाली काढण्यात यावी.
नाफेड मार्फत हरभरा एकरी तिन क्विंटल खरेदी करण्यात येते ती एकरी 10 क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात यावी.या मागणी चे निवेदन
मा.सुभाष भाऊ धोटे ,आमदार राजुरा यांच्या मार्ग दर्शना खाली
श्री विजयराव बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर, श्री उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कोरपना, श्री श्याम भाऊ रणदिवे माजी सभापती प स कोरपना,श्री सीताराम कोडापे माजी सदस्य जिल्हा परिषद ,श्री सुरेश मालेकर श्री राजाभाऊ गलगट, श्री राहुल मालेकार अध्यक्ष ओबीसी काँग्रेस कोरपना ,रसूल पटेल ,विश्वास मालेकार ,अनिल गोंडे माजी उपसरपंच व इतर मान्यवर यांच्या उपस्थित निवेदन सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here