गोपाळ दिनकर म्हात्रे अनमोल रत्न राष्ट्रीय अवॉर्ड ने सन्मानित.

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 25.सप्टेंबर मुंबई चर्च गेट, आय. एम सी येथे झालेल्या महाराष्ट्र लोक कल्याण सेवा संस्था व अमरदीप बाळ विकास फाऊंडेशन याच्या विद्यमाने आसनास हेल्थकेअर अडुकेशन फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अनमोल रत्न अवॉर्डने अनेकांना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्यांना एकूण देशातून 80 जणांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे गावामधील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देण्यासाठी पदमश्री डॉ रमाकांत देशपांडे, पदमश्री डाँ मुकेश बात्रा,अभिनेता कायवंत सावरकर,हौडो होंग राजदूत कोरिया,आणतोन पाषको राजदूत बेलारुस,डॉ अमजद खान पठाण,एन. डी खान,सलमा खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक गोपाळ म्हात्रे यांना अनमोल रत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here